भाजपला धक्का; एनडीएमधून आणखी एक पक्ष बाहेर

वृत्तसंस्था
सोमवार, 7 जानेवारी 2019

लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि भाजपला (एनडीए) धक्का बसला आहे. आसाम गण परिषद (एजीपी) राज्यात भाजपापासून वेगळी झाली आहे. एजीपी आसाममधील भाजपा सरकारमध्ये सहकारी पक्ष असून त्यांचे 14 आमदार आहेत.

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि भाजपला (एनडीए) धक्का बसला आहे. आसाम गण परिषद (एजीपी) राज्यात भाजपापासून वेगळी झाली आहे. एजीपी आसाममधील भाजपा सरकारमध्ये सहकारी पक्ष असून त्यांचे 14 आमदार आहेत.

राज्यात जर नागरिकत्व विधेयक संमत झाले नाही तर पुढील पाच वर्षांत राज्यात हिंदू अल्पसंख्यक ठरतील असे, आसामचे मंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी म्हटले आहे. विधेयक संमत झाले नाही तर आसामचा दुसरा काश्मीर करणाऱ्या लोकांसाठी हे फायदेशीर ठरेल, असा धोकाही त्यांनी व्यक्त केला आहे. नागरिकत्व अधिनियम, 1955 हे दुरूस्तीसाठी लोकसभेत सादर केले आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशातून अल्पसंख्यक समाजातील लोकांना भारतात 12 वर्षांऐवजी 6 वर्षे वास्तव केल्यानंतरच नागरिकत्व प्रदान करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, एजीपीचा एकही खासदार नाही. एजीपीने केंद्र सरकारकडून आणण्यात येणाऱ्या नागरिकत्व (संशोधन) विधेयकाला विरोध केला आहे. नागरिकत्व (संशोधन) विधेयक 2016 संसदेत संमत झाले तर आपण राज्यातील आघाडीच्या सरकारमधून बाहेर पडू असा इशारा एजीपीने आधीच दिला होता. एजीपीने पाठिंबा काढला असला तरी राज्यातील सर्वानंद सोनोवाल सरकारला कोणताच धोका नाही.

Web Title: Assam Gan Parishad Left Nda Bjp In Assam