Hijab Case : हिजाब घालून आलेल्या विद्यार्थीनीला शाळेबाहेरच रोखलं; मारहाणही केली

Assam girl stopped outside school : आसामच्या गुवाहाटीमधून एक संतापजनक प्रकरण समोर आलं आहे
hijab support students work on PFI warning state govt supreme court Bangalore
hijab support students work on PFI warning state govt supreme court BangaloreHijab Controversy

Assam girl stopped outside school :

नवी दिल्ली- आसामच्या गुवाहाटीमधून एक संतापजनक प्रकरण समोर आलं आहे. शाळेत हिजाब घालून आलेल्या एका विद्यार्थीनीला काही हिंदूत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शाळेत जाण्याआधीच रोखलं. तसेच तिच्या सोबत असलेल्या मुलाने या प्रकाराला विरोध केल्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली. तसेच आरोपींनी विद्यार्थीनीलाही मारहाण केल्याचं कळतंय. पोलिसांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली असून चौकशी सुरु केली आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील बातमी दिली आहे.

स्थानिक लोकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 10 वीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीला मारहाण करण्यात आली आहे. आरोपींनी विद्यार्थीला ओढत शाळेच्या बाहेर काढलं, त्यानंतर तिला मारहाण केली. विद्यार्थीनीसोबत असलेल्या एका मुलालाही मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे जेव्हा आरोपी मुलीला मारहाण करत होते तेव्हा शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक किंवा इतर कर्मचारी विद्यार्थींनीला वाचवण्यासाठी पुढे आले नाहीत. सदर घटनेमुळे स्थानिक लोकांमध्ये असंतोष निर्माण झालाय. स्थानिकांनी या घटनेविरोधात आंदोलन केले. माहितीनुसार, आरोपी बाहेरुन आले होते.

hijab support students work on PFI warning state govt supreme court Bangalore
Sakal Podcast : बारसूप्रकरणी फडणवीसांचा आरोप ते राहुल गांधीच्या शिक्षेला स्थगिती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या परिस्थिती नियंत्रणात आली आहे. असे असले तरी परिसरात तणावाचे वातावरण असल्याचं बोललं जातं. शाळेने यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. एक आठवड्यापूर्वी काही कट्टरपंथी लोक शाळेत आले होते. त्यांनी शाळेत हिजाब घालून घेणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत चिंता व्यक्त केली होती. शाळेचा गणवेश असताना विद्यार्थ्यांना हिजाब घालून येण्यास परवानगी देणे चुकीचे आहे. त्यामुळे शाळेत हिजाब घालून येण्यास बंदी घालावी. शाळेच्या मुख्याध्यापकासमोर लोकांनी ही मागणी ठेवली होती.

hijab support students work on PFI warning state govt supreme court Bangalore
Rahul Gandhi :कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर राहुल गांधी थेट लालूप्रसाद यादव यांच्या भेटीला, राजकीय हालचालींना वेग

माहितीनुसार, विश्व हिंदू परिषदेशी संबंधित माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या मुख्याध्यपकांची भेट घेतली होती. त्यांनी शाळेत हिजाबवर बंदी घालण्याची मागणी केली होती. पण, शाळा प्रशासनाकडून याप्रकरणी कोणत्याही सुचना दिल्या नव्हत्या. आसाम सरकारकडूनही यासंदर्भात कोणतीही सुचना दिली गेलेली नाही. शाळेच्या मुख्याध्यापकांनी हिजाब न घालून येण्याच्या तोंडी सुचना विद्यार्थ्यांना दिल्या होत्या असं कळतंय. दरम्यान, पोलिसांनी हे धार्मिक प्रकरण नसल्याचं म्हटलंय. या प्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे. यात जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com