आसाममधील संचारबंदी उठविली; ब्रॉडबॅन्ड सेवाही सुरु

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 डिसेंबर 2019

आसाममध्ये हिंसाचार उफाळल्यानंतर सरकारने राज्यातील इंटरनेट सेवा बंद केली होती. तसेच गुवाहाटीसह आसाममधील काही भागांमध्ये संचारबंदीही लागू करण्यात आली होती. परंतू, आसाममधील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

गुवाहाटी : नागरिकत्व दुरूस्ती कायद्यावरून (कॅब) आसाममध्ये आगडोंब उसळल्यानंतर आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. आज (मंगळवार) सकाळी सहा वाजता संचारबंदी उठविण्यात आली असून, ब्रॉडबॅन्ड सेवाही सुरु करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आसाममध्ये हिंसाचार उफाळल्यानंतर सरकारने राज्यातील इंटरनेट सेवा बंद केली होती. तसेच गुवाहाटीसह आसाममधील काही भागांमध्ये संचारबंदीही लागू करण्यात आली होती. परंतू, आसाममधील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने संचारबंदी उठविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यातील ब्रॉडबॅन्ड इंटरनेट सेवाही सुरू करण्यात आली आहे. मात्र, मोबाईल इंटरनेवर मात्र बंदी कायम आहे.

राहुल-सावरकर-रेप इन इंडिया, काय आहे यामागचे सत्य?

केंदीय मंत्री डॉ. जितेंद्रसिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे. मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला होता. त्यानंतर राज्यातून संचारबंदी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
नागरिकत्व दुरूस्ती कायदा लागू झाल्यानंतर ईशान्येकडील राज्यांमध्ये हिंसाचार उफाळला होता. आसाममध्ये झालेल्या निदर्शनांदरम्यान शेकडो जणांना अटकही करण्यात आली आहे. आसाममधील शाळा आणि महाविद्यालये 22 डिसेंबरपर्यंत बंद आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assam govt lifts curfew in Guwahati resumes broadband services over amended citizenship law