
बारपेटा (आसाम) : तुरुंग म्हटले की डोळ्यासमोर येतात उंच भिंती, कडक पहारा, त्यात शिक्षा भोगणारे कैदी. आसाममधील बारपेटा तुरुंगही पहिल्या नजरेत इतर तुरुंगांसारखाच दिसतो, मात्र तुरुंगाच्या आवारात डोलणाऱ्या अनेक प्रकारच्या पिकांमुळे तो जणू कृषी केंद्रच बनला आहे. तुरुंगातील कैदी वेगवेगळ्या प्रकारची पीके पिकवित आहेत.