पाचशे डॉक्टरांची टीम भाजपमध्ये दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Assembly elections 500 doctors joined BJP new delhi

पाचशे डॉक्टरांची टीम भाजपमध्ये दाखल

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने सत्ता टिकवण्याच्या दृष्टीने प्रयत्न वाढविले आहेत. गेली सुमारे तीन दशके भाजपने हे राज्य गमावलेले नाही. निवडणुकीपूर्वी गुजरातमधील सुमारे ५०० डॉक्टरांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या उपस्थितीत काल गांधीनगरमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. डॉक्टरांनी इतक्या मोठ्या संख्येने भाजपवासी होण्याच्या या घटनेमुळे गुजरातमध्ये भाजपची ताकद आणखी वाढल्याचे मानले जाते.

गुजरातमध्ये आधीच निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय घडामोडींना भाजपने वेग दिला आहे. समाजातील प्रत्येक घटकांचा मोठा पाठिंबा भाजपला आहे हे दाखविण्याचे पक्षाचे प्रयत्न आहेत. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये सत्ता कायम राखण्यात भाजपला यश मिळाल्यावर दुसऱयाच दिवसापासून भाजपने गुजरात, हिमाचल प्रदेशाच्या निवडणुकांची तयारी सुरू केली होती. पंतप्रधान स्वतःच गांधीनगरमध्ये पोचल्यावर कार्यकर्त्यांचा उत्साह आणखी वाढला.या राज्यात भाजपने गेल्या २७ वर्षांत सत्ता गमावलेली नाही. आता तर भाजपचे सर्वेसर्वा नेतृत्वच गुजरातमधील असल्याने येथील विधानसभा निवडणुका भाजपसाठी कमालीच्या प्रतिष्ठेचा विषय ठरत आल्या आहेत. कॉंग्रेसमध्ये आऊटगोईंग सुरू असताना दिल्ली व पंजाबातील सत्तारूढ आम आदमी पक्षानेही यंदा गुजरातमध्ये हातपाय पसरण्याची जोरदार धडपड चालविली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप कोणतीही कसर सोडू इच्छित नाही.

सहा महिने अथक परिश्रम करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन महिन्यात दोनदा दौरा केला. येत्या काही महिन्यात मोदी गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भाजपने पुढचे ६ महिने न थांबता काम करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना याआधीच दिले आहेत. प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील म्हणाले, की कार्यकर्ते सक्रिय राहावेत अशी आमची इच्छा आहे.

Web Title: Assembly Elections 500 Doctors Joined Bjp New Delhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top