अटलबिहारी वाजपेयी सदैव स्मरणात राहतील : अडवानी

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

मला सहा वर्षे उपपंतप्रधान म्हणून काम करण्याची संधी मिळाली. माझे वरिष्ठ म्हणून मला ते नेहमी मार्गदर्शन करायचे. वाजपेयी सरकारमधील माजी पंतप्रधान म्हणून ते सदैव आमच्या स्मरणात राहतील.

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे वयाच्या 93 व्या वर्षी आज (गुरुवार) निधन झाले. त्यांच्या निधनानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी वाजपेयींना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, ''अटलबिहारी वाजपेयी हे पक्षाच्या केंद्रीय स्तरावरील मोठे नेते होते. ते सदैव आमच्या स्मरणात राहतील''.

अडवानी म्हणाले, वाजपेयींसोबत बराचसा काळ मी व्यतित केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकापासून मी त्यांच्यासोबत होतो. भारतीय जनसंघ पक्षात आम्ही एकत्र होतो. त्यांनी आणीबाणीच्या काळात खूप संघर्ष केला. त्यादरम्यान त्यांनी जनता पक्ष आणि त्यानंतर हा जनता पक्ष 1980 मध्ये भारतीय जनता पक्षात विलीन केला. त्यांच्या निधनाची वृत्त समजल्यानंतर मी नि:शब्द झालो. अटलजी सदैव आमच्या स्मरणात राहतील.

मला सहा वर्षे उपपंतप्रधान म्हणून काम करण्याची संधी मिळाली. माझे वरिष्ठ म्हणून मला ते नेहमी मार्गदर्शन करायचे. वाजपेयी सरकारमधील माजी पंतप्रधान म्हणून ते सदैव आमच्या स्मरणात राहतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Atal Bihari Vajpayee will always remember says Advani