
दिल्लीतील महिला त्यांच्या खात्यामध्ये २५०० रुपये जमा झाल्याच्या संदेशाची मोबाईलवर प्रतीक्षा करीत होत्या. पण ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी नाही तर केवळ एक ‘जुमला’ होता हे दिल्लीतील भाजप सरकारने सिद्ध केले, अशी टीका दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी केली.