
नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्री निवडीला होत असलेल्या विलंबाच्या मुद्द्यावरून आम आदमी पक्षाने भाजपवर टीका केली आहे. भाजपमध्ये या पदासाठी मोठा संघर्ष असून त्यामुळे विलंब होत आहे. पुढील पाच वर्षात दिल्लीकरांना तीन मुख्यमंत्री पाहायला मिळू शकतात, असा टोला माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना मारला.