अभिनेत्रीवर लैंगिक अत्याचार : साक्षीदारांची पुनर्तपासणी करण्याचे केरळ उच्च न्यायालयाचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

court hammer

अभिनेत्रीवर लैंगिक अत्याचार : साक्षीदारांची पुनर्तपासणी करण्याचे आदेश

केरळ (Kerala) उच्च न्यायालयाने सोमवारी अभिनेत्रीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात (Atrocities on the actress) तीन साक्षीदारांची पुनर्तपासणी करण्यास परवानगी (Re-examine the witnesses) दिली आहे. या खटल्यातील अन्य पाच साक्षीदारांना समन्सही बजावले आहे. मल्याळम चित्रपट अभिनेता दिलीप हा देखील या प्रकरणातील एक आरोपी आहे. सोमवारी न्यायमूर्ती कौसर एडप्पागथ यांनी राज्य सरकारचे अपील स्वीकारताना ट्रायल कोर्टाचा निर्णय बाजूला ठेवला.

ट्रायल कोर्टाने २०१७ च्या अभिनेत्री लैंगिक अत्याचार प्रकरणात (Atrocities on the actress) आणखी अनेक साक्षीदारांना आणि आरोपींच्या फोन कॉल रेकॉर्डच्या साक्षांकित प्रतींना बोलावण्याची राज्य सरकारची विनंती नाकारली होती. या आदेशात (High Court Order) परवानगी दिल्यानुसार अतिरिक्त पुरावे सादर करणे हे आदेशाची प्रत मिळाल्यापासून दहा दिवसांच्या आत कोर्टाने केले पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

हेही वाचा: मी गाव गुंडाबद्दल बोलत होतो, त्याचं नाव मोदी आहे; पटोलेंचे स्पष्टीकरण

कोर्टाने म्हटले आहे की, अभियोग महासंचालक हे सुनिश्चित करतील की नवीन विशेष सरकारी वकील नियुक्त केले जातील किंवा इतर काही पर्यायी व्यवस्था केली जाईल. जेणे करून न्यायालय हे प्रकरण पुढे चालवू शकेल. ट्रायल कोर्टाने २१ डिसेंबर रोजी तीन साक्षीदारांना समन्स बजावण्याची परवानगी दिली होती. परंतु, इतरांना बोलावण्याची विनंती फेटाळली होती.

तक्रारीनुसार, तामीळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीचे १७ फेब्रुवारी २०१७ च्या रात्री काही आरोपींनी अपहरण केले आणि सुमारे दोन तास कारमध्ये विनयभंग केला. काही आरोपींनी ब्लॅकमेल करण्यासाठी घटनेचा व्हिडिओ बनवला. या प्रकरणात दहा आरोपी असून त्यापैकी पोलिसांनी सुरुवातीला सात आरोपींना अटक केली होती. या प्रकरणी पोलिसांनी दिलीपला अटकही केली आणि नंतर त्याला जामीन मिळाला.

Web Title: Atrocities On Actress Re Examine The Witnesses Kerala High Court Order

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..