गुजरात दंगल : तिस्ता सेटलवाड यांच्यावर कारवाई, ATS ने घेतलं ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुजरात दंगल : तिस्ता सेटलवाड यांच्यावर कारवाई, ATS ने घेतलं ताब्यात

गुजरात दंगल : तिस्ता सेटलवाड यांच्यावर कारवाई, ATS ने घेतलं ताब्यात

मुंबई : 2002 च्या गुजरात दंगलीवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी गुजरात एटीएसच्या दोन पथकांनी तिस्ता सेटलवाड यांना ताब्यात घेतले आगे.त्यांना मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून एटीएसचे पथक त्यांना चौकशीसाठी अहमदाबादला घेऊन जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तत्पूर्वी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने झाकिया जाफरी यांची याचिका फेटाळून लावताना तिस्ता सेटलवाड यांच्या एनजीओची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर एटीएसने ही कारवाई केल्याचे समजते. त्याचवेळी, शनिवारी सकाळी गृहमंत्री अमित शहा यांनीही तीस्ता सेटलवाड यांच्यासह अनेक राजकारण्यांवर नरेंद्र मोदींची बदनामी केल्याचा आरोप केला.

गुजरात एटीएसने तीस्ता सेटलवाड यांच्याविरोधात मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. ज्यामध्ये त्यांच्यावर आयपीसीच्या कलम ४६८ आणि ४७१ अंतर्गत खोटारडेपणाचा आरोप करण्यात आला आहे. एटीएस अधिकारी जस्मिन रोजिया यांनी सांगितले की, तीस्ता सेटलवाडला सांताक्रूझ पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना अहमदाबाद शहर पोलीस ठाण्यात नेण्यात येईल. एटीएस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही, फक्त ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचा: आमदारांसाठी खर्च कोण करतंय; केसरकर म्हणाले, पगार...

हेही वाचा: Maharashtra Politics : सेना भवनात उद्धव ठाकरेंनी थेट बापच काढला

सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले

गुजरात दंगलीवर सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या एसआयटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ६२ राजकारणी आणि अधिकाऱ्यांना दिलेल्या क्लीन चिटविरोधात झाकिया जाफरी यांनी याचिका दाखल केली होती.जी कायद्याचा गैरवापर करणे योग्य नाही असे म्हणत शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. सुप्रीम कोर्टाने एसआयटीच्या तपासाचे कौतुक करत कायद्याशी खेळणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी घणाघाती टीका केली. सुप्रीम कोर्टाने तीस्ता सेटलवाड यांचेही नाव घेतले आणि सेटलवाड यांच्या विरोधात आणखी चौकशीची गरज असल्याचे सांगितले.

Web Title: Ats Team At Teesta Setalvad Home Zakia Jafri In Gujarat Riots Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Narendra Modi
go to top