डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांना दणका; अजामीनपत्र गुन्हा आणि दोन लाखांपर्यंत दंड

Attacks On Doctors Medical Staff Will Not Be Tolerated Says Prakash Javadekar
Attacks On Doctors Medical Staff Will Not Be Tolerated Says Prakash Javadekar

नवी दिल्ली : डॉक्टरांवर, आरोग्य कर्मचाऱ्यांवर होत असलेले हल्ले लक्षात घेता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर  झालेले हल्ले सरकार मुळीच सहन करणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. असा प्रकार घडल्यास हा अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार असून त्या व्यक्तीवर दोन लाखापर्यंत दंड आकारला जाऊ शकतो, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जावडेकर म्हणाले, ' डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने हा नवा अध्यादेश काढला आहे. त्यामध्ये त्यांच्या सुरक्षेसाठी ही तरतूद करण्यात आली आहे. या अध्यादेशाला राष्ट्रपतींनीही मंजुरी दिली आहे.

दरम्यान, सध्या कोरोनाच्या लढाईत डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी हे प्राणांची बाजी लावून लढत आहेत. मात्र त्यांच्याविरोधात हिंसा करण्याचे, त्यांना हीन वागणूक देण्याचे प्रकार देशात घडले हे दुर्दैवी आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.  Epidemic Diseases Act, 1897 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांच्यावर हल्ला केल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल होईल. तसेच तीन महिने ते पाच वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद असेल आणि ५० हजार ते २ लाखापर्यंतचा दंडही वसूल करण्यात येईल, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com