
बंगळुरूतील इंजिनिअर अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. अतुलच्या पत्नी निकिताने कौटुंबिक न्यायालयात दिलेल्या निवेदनानुसार, तिने जौनपूरमध्ये 60 लाख रुपये किमतीचे घर विकत घेतले आहे. तिचा मासिक पगार 78,845 रुपये असूनही, मोठ्या कर्जाच्या हप्त्यामुळे ती मुलाच्या पालनपोषणासाठी असमर्थ असल्याचा दावा तिने केला.