Deloitte Resigns:अदानी समुहाच्या ऑडिटरचा राजीनामा! कंपनीच्या व्यवहारांबद्दल व्यवस्थापनाशी झाला होता वाद

अदानी उद्योग समुहाच्या व्यवहारांचं ऑडिट करणाऱ्या डेलॉयट कंपनीने राजीनामा दिला आहे. डेलॉईट कंपनीने आपल्या निर्णयाबद्दल अदानी पोर्ट्स अ‍ॅंड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडला याबद्दल माहिती दिली होती.
adani group
adani groupesakal

Adani's Audit Firm Resigned :अदानी उद्योग समुहाच्या व्यवहारांचं ऑडिट करणाऱ्या डेलॉयट कंपनीने राजीनामा दिला आहे. डेलॉईट कंपनीने आपल्या निर्णयाबद्दल अदानी पोर्ट्स अ‍ॅंड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडला याबद्दल माहिती दिली होती. त्यानंतर त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली. काही व्यवहारांवर कंपनीच्या व्यवस्थापनासोबत झालेल्या वादामुळे ऑडिटरने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता.

डेलॉयट हास्किंस अ‍ॅंड सेल्स एलएलपीने राजीनामा दिल्यानंतर अदानी समूहाच्या अकाऊंटिंग क्वालिटीवर प्रश्न केले जाऊ शकतात. अदानी समुह आधीचं हिंडनबर्ग रिसर्च रिपोर्ट समोर आल्यावर निशाण्यावर होता.

डेलॉयटने कंपनीच्या व्यवहारांवर उचलले प्रश्न

२०२२-२३च्या शेवटच्या टप्प्यातील ऑडिटर्सच्या अहवालात आणि २०२२-२३ च्या ऑडिटमध्ये, डेलॉइटने कंपनीच्या खात्यांवरील तीन व्यवहारांवर प्रश्न उपस्थित केले होते. डेलॉईटने म्हटलं होतं की, कंपनीचे दावे सिद्ध करण्यासाठी कोणताही बाह्य तपास न केला गेल्याने, कंपनीच्या स्टेटमेंटची पडताळणी आम्ही करु शकतं नाही.

तेव्हा ऑडिट कंपनी म्हणाली होती की अदानी समुहाच्या दाव्यांचा पाठपुरावा ते करु शकत नाहीत, त्याचबरोबर स्थानिक कायद्यांचं पालन झालंय की नाही ते सांगणं अवघड आहे.

अदानी पोर्ट्सच्या ऑडिटर्सचा हा निर्णय तेव्हा समोर आला, जेव्हा शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सेबी (SEBI)ला हिंडरबर्गच्या आरोपांबद्दल सुप्रिम कोर्टात स्टेटस रिपोर्ट जमा करायचा आहे. हिंडनबर्ग रिसर्चने २४ जानेवारीला आपल्या एका अहवालात अदानी समुहावर फसवणूक,स्टॉक मॅनिप्युलेशन आणि मनी लाँड्रिंगचे आरोप केले होते. अदानी समुहाने सर्व आरोप फेटाळून लावले होते.

हिंडनबर्ग रिपोर्ट आल्यानंतर अदानी समुहाच्या शेअरची किंमत कमी झाली

हिंडनबर्ग रिपोर्ट आल्यानंतर अदानी समुहाच्या किंमतीमध्ये मोठी घट बघायला मिळाली होती. मात्र, कंपनीने घेतलेले कर्ज परत करुन गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकला आणि गमावलेली प्रतिष्ठाही परत मिळवली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com