Aurangabad : लोकशाही नव्हे,देशात हुुकूमशाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad news

Aurangabad : लोकशाही नव्हे,देशात हुुकूमशाही

पाटणा : केंद्रातील भाजप सरकारची कार्यपद्धती पाहता देशात अघोषित आणीबाणी लागू झाली असून त्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बोलायला हवे होते, अशी टीका बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केली. देशात लोकशाहीच्या नावावर हुकूमशाही दिसत असल्याचाही आरोपही राजद नेते तेजस्वी यादव यांनी केला.

हेही वाचा: Aurangabad : औरंगाबादेतील आनंद हास्य क्लब देतोय चिंतामुक्त होण्याची शिकवण

गृहमंत्री अमित शहा यांनी काल एका कार्यक्रमात मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राजदचे नेते लालू प्रसाद यादव हे समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांच्या विचारसरणीला विसरले असल्याचा आरोप केला होता. त्यावर आज पत्रकार परिषदेत बोलताना तेजस्वी यादव म्हणाले, की काल शहा जे काही बोलले ते सर्व निरर्थक होते. भाजपचे जयप्रकाश नारायण यांच्या विचारांशी काही देणेघेणे नाही. भाजपमधील लोक कार्यक्रम कसा साजरा करतात हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त सितारा दियारा (सरणा)चे आयोजन केले आणि त्यात ते सहभागी झाले. यावेळी शहा यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारकडून देशात लागू असलेल्या अघोषित आणीबाणीबाबत बोलायला हवे होते.

हेही वाचा: Aurangabad : महाराष्ट्रात सर्वाधिक ई-कचरा प्रक्रिया केंद्रे

यादव म्हणाले, की केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार हे एक हुकुमशाहीचे सरकार आहे. लोकशाही कोठे आहे.?राष्ट्रीय जनता दलात कोणत्याही प्रकारचे मतभेद नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बिहारचे राजदचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह हे दिल्लीतील पक्षाच्या दोन दिवसीय अधिवेशनात हजर का राहिले नाहीत? असे विचारले असता ते म्हणाले, की जगदानंद सिंह यांच्याविषयी आपणास काहीच ठाऊक नाही असे दिसते. ते एक प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. पक्षात कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत.