फक्त लस न घेणारेच लॉकडाऊनमध्ये; 'या' देशाने उचललं कठोर पाऊल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फक्त लस न घेणारेच लॉकडाऊनमध्ये; 'या' देशाने उचललं कठोर पाऊल

फक्त लस न घेणारेच लॉकडाऊनमध्ये; 'या' देशाने उचललं कठोर पाऊल

नवी दिल्ली : युरोपमध्यो कोरोनाव्हायरसचा कहर वाढतो आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय की, युरोप आता पुन्हा एकदा महासाथीचं केंद्र बनत चालला आहे. कोरोना संक्रमणामुळे सध्या सर्वाधिक प्रभावित पश्चिम युरोप असून त्याठिकाणी संक्रमितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे त्याठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या दरम्यानच आता ऑस्ट्रिया या देशाने एक नवं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. लसीकरणाचा वेग फारच कमी झाला असून लोक लस घेण्यास पुढे येत नसल्याचं लक्षात येताच सरकारने कठोर पाऊल उचललं आहे. लस न घेणाऱ्या नागरिकांच्या विरोधात कारवाई करत अशा लोकांना लॉकडाऊनमध्ये टाकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

हेही वाचा: बॉम्ब फोडणार म्हणतात, साधी लवंगी फुटत नाही - संजय राऊत

ऑस्ट्रियाचे चान्सलर ऍलेक्झांडर शालेनबर्ग यांनी शुक्रवारी अशी घोषणा केली आहे की, अपर ऑस्ट्रिया आणि साल्जबर्गमधअये लसीचा डोस न घेणाऱ्यांना सोमवारी फक्त काही कारणांसाठीच घराबाहेर पडता येईल. यामध्ये अत्यावश्यक सामान खरेदी, वैद्यकीय कारणे अथवा नोकरी करण्यासाठीच घराबाहेर पडता येईल. शालेनबर्ग यांनी म्हटलंय की, ते देशभर अशा कठोर पावलांची अंमलबजावणी करणार आहेत. ऑस्ट्रियासोबतच शेजारी देश जर्मनीमध्ये देखील या संक्रमणाची गती खूपच वाढली आहे.

युरोपात बिकट परिस्थिती

कोरोना व्हायरसच्या महासाथीला आता दोन वर्षे पूर्ण होत आली तरीही संक्रमणामध्ये सध्या तेजी दिसून येत आहे. विशेषत: ज्याठिकाणी लसीकरणाची गती आणि संख्या अधिक आहे, तसेच वैद्यकिय सुविधा अधिक असून देखील हे संक्रमण घातक ठरणं, आश्चर्यजनक मानलं जात आहे. लॉकडाऊन लागू करण्याची वेळ येणं, हैराण करणारं आहे.

हेही वाचा: दिल्लीमध्ये हेल्थ इमर्जन्सीची परिस्थिती; प्रदुषित हवा बनली 'जीवघेणी'

आरोग्य संघटनेनं म्हटलंय की, युरोपात गेल्या आठवड्यात कोरोनामुळे प्राण गमावणाऱ्यांची संख्या 10 टक्क्यांनी वाढली आहे. तसेच युरोप पुन्हा एकदा महासाथीचा केंद्रबिंदू ठरत असल्याचं WHO ने म्हटलंय.

नेदरलँड्स आणि स्पेनमध्ये देखील परिस्थिती बिकट आहे. आणखी परिस्थिती बिघडू शकते, अशी सूचना आधीच देण्यात आली आहे. स्पेनने आपल्या 80 टक्के लोकसंख्येला लस दिली असून बाहेर मास्क लावणे अनिवार्य केलं नाहीये. तरीदेखील लोक स्वयंशिस्तिने मास्क लावत असूनही संक्रमण वाढताना दिसून येत आहे.

loading image
go to top