esakal | कोरोनाग्रस्तांना रुग्णालयापर्यंत पोहोचवणारा देवमाणूस!

बोलून बातमी शोधा

कोरोनाग्रस्तांना रुग्णालयापर्यंत पोहोचवणारा देवमाणूस!
कोरोनाग्रस्तांना रुग्णालयापर्यंत पोहोचवणारा देवमाणूस!
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

देशात कोरोनाचा कहर सातत्याने वाढत आहे. त्यातच दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे अनेक रुग्णालये व कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन सिलेंडर, बेड यांची कमतरता जाणवत आहे. यामध्येच आता काही ठिकाणी रुग्णवाहिकांचा देखील तुटवडा जाणवत असून लॉकडाउनमुळे रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत नेण्याचं साधनदेखील उपलब्ध नसल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्येच एक रिक्षाचालक अनेक कोरोनाग्रस्तांनासाठी देवदूत ठरला आहे. झारखंडमध्ये असलेला एक रिक्षाचालक कोरोनाग्रस्तांना मोफत रुग्णालयांपर्यंत पोहोचवत आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या रिक्षाचालकाची चर्चा रंगली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे अनेक ठिकाणी लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. या काळात वाहतूक सेवेवरदेखील निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक कोरोना रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयापर्यंत पोहोचण्यास अडचण येत आहे. त्यामुळे झारखंडमधील रांची येथे राहणाऱ्या रवी यांनी कोरोनाग्रस्तांना मोफत रुग्णालयापर्यंत पोहोचविण्याची सोय केली आहे.

हेही वाचा: Veg - Non veg; रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढवणारे पदार्थ

१५ एप्रिलपासून रवी कोरोनाग्रस्तांना त्यांच्या रिक्षातून मोफत रुग्णालयापर्यंत पोहोचवत आहेत. विशेष म्हणजे रवी यांचा फोन नंबर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक जण त्यांच्याकडे मदतीची मागणी करत आहेत.