त्यानं कारचं बोनेट उघडलं अन् घात झाला; पाहा थरारक Viral Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral

त्यानं कारचं बोनेट उघडलं अन् घात झाला; पाहा थरारक Viral Video

स्वयंचलित कारचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून दुरूस्तीसाठी गाडीच्या बोनेटपुढे असलेल्या व्यक्तीला गाडीने धडक दिली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी अशा गाड्यापासून सावधानतेचा इशारा दिला आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्यालाही धक्का बसेल.

(Automatic Car Viral Video)

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ संदर्भात अधिकची माहिती समोर आली नसून दिपक प्रभू यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्वीटरवरून शेअर केला आहे. अॅटोमॅटिक गाड्यांसमोर उभे राहू नका. आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना पण कळवा अशी सूचना त्यांनी आपल्या ट्वीटरवरून केली आहे.

या गाडीची दुरूस्ती चालू असताना ही गाडी अचानक सुरू होते आणि समोर दुरूस्तीसाठी उभा असलेल्या व्यक्तीला गाडीने धडक दिली आणि दुकानाच्या शटर तोडून आत गेली. त्यानंतर व्यक्ती शटर आणि गाडीच्या बोनेटमध्ये अडकला होता पण जवळ असलेल्या व्यक्तींना आरडाओरड करून त्याला बाहेर काढले पण या दुर्घटनेत त्या व्यक्तीला किती दुखापत झाली याची माहिती अद्याप समोर आली नाही.

Web Title: Automatic Car Bonnet Repairing Garage Viral Video

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :carviral video