VIDEO : उत्तराखंडच्या 'केदारनाथ'मध्ये हिमस्खलन; निसर्गाचा रुद्रावतार कॅमेऱ्यात कैद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kedarnath Temple

केदारनाथ मंदिराजवळ पुन्हा एकदा हिमस्खलन झालं आहे.

VIDEO : उत्तराखंडच्या 'केदारनाथ'मध्ये हिमस्खलन; निसर्गाचा रुद्रावतार कॅमेऱ्यात कैद

नवी दिल्ली : केदारनाथ मंदिराजवळ (Kedarnath Temple) पुन्हा एकदा हिमस्खलन झालं आहे. उत्तराखंडच्या (Uttarakhand) केदारनाथ धाममध्ये बर्फाचा डोंगर कोसळला आहे. मात्र, या हिमस्खलनात केदारनाथ मंदिराचं कोणतंही नुकसान झालं नाही ही दिलासादायक बाब आहे.

श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे (Badrinath-Kedarnath Temple Committee) अध्यक्ष अजेंद्र अजय (Ajendra Ajay) यांनी याबाबत माहिती दिली. केदारनाथ धामजवळील या आधीच्या घटनेनंतर प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचं समोर आलं. हवामानातही बदल होताना दिसत आहेत. गेल्या आठवड्यातही केदारनाथ धामजवळ हिमस्खलनाचे भयानक दृश्य पाहायला मिळालं होतं.

विशेष म्हणजे, त्या दिवशीही कोणतंही नुकसान झालं नसल्याचं समोर आलं होतं. एका वृत्तसंस्थेनं केदारनाथ धाम परिसरात हिमस्खलनाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये भयानक दृश्य पाहायला मिळतं. केदारनाथ धामजवळील परिसरात असलेल्या टेकड्यांवरून बर्फाचे पर्वत किती वेगाने खाली येत आहेत, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. शुक्रवारीच चार धाम यात्रेला गेलेले बिहारमधील चार जण पर्वत तुटल्यामुळे उत्तरकाशीमध्ये अडकले होते. ज्या भागात बर्फ कोसळण्याचा तडाखा बसला आहे, तो भाग चोरबारी ग्लेशियर कॅचमेंट एरिया म्हणून ओळखला जातो. हे ठिकाण केदारनाथ मंदिर परिसरापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. गुरुवारी सायंकाळी 6.30 वाजता हे हिमस्खलन झालं आहे.

हेही वाचा: Congress : मल्लिकार्जुन खर्गे होणार काँग्रेसचे नवे अध्यक्ष? G-23 नेत्यांचा खर्गेंना पाठिंबा!