esakal | मुंबई, पुण्यासाठी मध्य प्रदेशातून विमानसेवा, ज्योतिरादित्य शिंदे यांची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई, पुण्यासाठी मध्य प्रदेशातून विमानसेवा

मुंबई, पुण्यासाठी मध्य प्रदेशातून विमानसेवा

sakal_logo
By
नामदेव कुंभार

नवी दिल्ली -उडान योजनेअंतर्गत मध्य प्रदेशातून भारतातील आठ मार्गांवर विमानसेवा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज केली. ज्योतिरादित्य शिंदे यांनी ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली. सरकारने उडान योजनेअंतर्गत नवी १०० विमानतळे सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आधीचे नागरी विमान वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी या योजनेअंतर्गत एक हजार मार्गांवर विमानसेवा सुरू करण्यासाठी योजना तयार करण्यात येत असल्याचे म्हटले होते.

ज्योतिरादित्य काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात आता त्यांना नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यांचे वडील १९९०च्या दशकाच्या सुरुवातीला याच खात्याचे मंत्री होते. आता १६ जुलैपासून नवी सेवा सुरू करण्याची घोषणा शिंदे यांनी केली आहे. त्यात मुंबई, पुणे, सुरत या शहरांसाठीच्या सेवेचा समावेश आहे.

अशी असेल नवी विमानसेवा

- ग्वाल्हेर - मुंबई - ग्वाल्हेर

- ग्वाल्हेर - पुणे - ग्वाल्हेर

- जबलपूर - सुरत - जबलपूर

- अहमदाबाद - ग्वाल्हेर - अहमदाबाद

loading image