विमान सुरक्षा अधिनियम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

plane

...तर विमान कंपन्यांना एक कोटींचा दंड, मोदी सरकारचा मसुदा तयार

 नवी दिल्ली : मुलकी विमान वाहतूक मंत्रालयाच्या हवाई सुरक्षा विभागाने (बीसीएएस) विमानांच्या, पर्यायाने प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत विमान सुरक्षा नियम 2022 ची 'मसुदा अधिसूचना' जारी केली आहे. या अंतर्गत सुरक्षा उपायांचे उल्लंघन केल्यास विमानतळ प्राधिकरणे आणि विमान कंपन्यांना 1 कोटी रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.

ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (बीसीएएस) ला सुरक्षेतील त्रुटींसाठी विमानतळ आणि विमान कंपन्यांना 1 कोटी रुपयांपर्यंत दंड आकारण्याचा अधिकार असेल. ही रक्कम यापूर्वी 10 लाख रुपये होती.

या मसुद्यात (बीसीएएस) ला नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विमानतळे आणि विमान कंपन्यांना 50 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत दंड आकारण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. ज्या कारणांमुळे हा दंड आकारला जाऊ शकतो, त्यापैकी 2 महत्त्वाची कारणे म्हणजे विमानतळ किंवा विमान कंपनी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बनवलेल्या नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास, त्यासाठी योग्य तयारी केली जात नाही किंवा सुरक्षा मंजुरीशिवाय विमान वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले तर संबंधितावर कारवाईचे अस्त्र उगारण्यात येईल. आगामी हिवाळी संसद अधिवेशनात या मसुद्याला संसदीय मंजुरी मिळवण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत.

बीसीएएस चे महासंचालक झुल्फिकार हसन यांनी सांगितले की देशभरातील विमानतळे आणि विमान वाहतुकीच्या सुरक्षेत आंतरराष्ट्रीय मानकांनुसार आणखी सुधारणा करण्यासाठी, विमान सुरक्षा नियम 2022 ला अंतिम रूप दिले जात आहे. देशभरात विमान वाहतूक सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी तसेच ती अधिक प्रभावी करण्यासाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ते म्हणाले की विमान सुरक्षा नियम 2011 मध्ये बदल करून हे नवीन नियम लागू केले जात आहेत.

मंत्रालयाने नागरिक व संबंधितांकडून याबाबत 30 दिवसांत सूचना मागवल्या आहेत.

संसदेत सप्टेंबर 2020 मध्ये विमान दुरुस्ती कायदा (दुरूस्ती) मंजूर करण्यात आला होता. या नवीन अधिसूचनेनुसार देशातल्या विमानतळाचे नकाशे, वास्तुरचना आणि लेआऊट नियमांनुसार नसल्यास संबंधितांना 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो आणि जर एखादी व्यक्ती काही गैरप्रकाराशी संबंधित आढळली तर त्यालाही 1 ते 25 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

सायबर सुरक्षा धोक्यांना सामोरे जाण्यासाठी विमान सुरक्षेवर काम करणाऱ्यांसाठी

सायबर सुरक्षेबाबतही नियम करण्यात आले आहेत. सायबर सुरक्षेबाबत या मसुद्यातील नियमही विशेष असून, त्याअंतर्गत विमानांच्या सुरक्षेसंदर्भात काम करणाऱ्या सर्व संस्थांना सदैव जागरूक रहावे, असे सांगितले आहे. दळणवळण तंत्रज्ञान प्रणाली अत्यंत सामायिक होऊ देऊ नये. संवेदनशील विमान वाहतूक सुरक्षा माहिती गोपनीय ठेवावी. संयुक्त राष्ट्रसंघाच्या “एव्हिएशन वॉचडॉग, इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन”(आयसीएसओ) च्या नुसार या कायद्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण नियमांची भारतात गरज आहे, असे म्हंटले होते. त्यावर आता नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने विमानांच्या सुरक्षेसंदर्भात विमान सुरक्षा नियम 2022 च्या नवीन मसुद्याची अधिसूचना जारी केली.

टॅग्स :Securityplaneplane travel