Bihar News : आठवड्यातून एक दिवस पेट्रोलची वाहने टाळा; बिहारच्या पर्यावरण विभागाची कर्मचाऱ्यांना सूचना

आपण इलेक्ट्रिक वाहने, सायकल, रिक्षांचा वापर केलाच पाहिजे
Avoid petrol vehicles for one day a week notice to Employees of Environment Department of Bihar
Avoid petrol vehicles for one day a week notice to Employees of Environment Department of Biharsakal
Updated on

पाटणा : वाढत्या वाहन प्रदूषणामुळे बिहार सरकारच्या पर्यावरण विभागाने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यापासून आठवड्यातून किमान एक दिवस पेट्रोल व डिझेलच्या वाहनांचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे.

Avoid petrol vehicles for one day a week notice to Employees of Environment Department of Bihar
Charging Electric Cars : आता इलेक्ट्रिक गाड्या चार्ज करणं महागणार, कर्नाटक सरकारने चार्जिंगवर लावला 18% जीएसटी

राज्याच्या पर्यावरण, वन व हवामान विभागाचे सचिव वंदना प्रेयशी यांनी या वाहनांऐवजी ऑगस्टपासून दर शुक्रवारी इलेक्ट्रिक वाहने, सायकलींचा वापर करण्याची सूचनाही कर्मचाऱ्यांना केली आहे.

त्यांनी आपल्या परिपत्रकात म्हटले आहे, की वाहनांचे वाढते प्रदूषण लक्षात घेऊन पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. त्यामुळे, ऑगस्ट महिन्यापासून बिहारच्या पर्यावरण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान एकदा पेट्रोल, डिझेलवरील वाहनांऐवजी पर्यावरणपूरक वाहनांचा वापर करण्याची सूचना केली आहे.

Avoid petrol vehicles for one day a week notice to Employees of Environment Department of Bihar
Electric Shock First Aid : पावसाळ्यात करंट लागल्यास ही काळजी घ्या अन् जीव वाचवा

आपण इलेक्ट्रिक वाहने, सायकल, रिक्षांचा वापर केलाच पाहिजे. त्याचप्रमाणे, शक्य असल्यास कार्यालयात पायी चालत आले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

हवामान बदलाचे परिणाम लोक आता अनुभवू लागले आहेत. त्यामुळे, आम्ही कार्यालयात निदान आठवड्यातून एकदा तरी प्रदूषण करणाऱ्या पेट्रोल व डिझेलच्या वाहनांचा वापर न करण्याचा निर्णय सामुदायिकरीत्या घेतला आहे. प्रत्येक शुक्रवारी तो अमलात आणला जाईल.

-वंदना प्रेयशी, सचिव, पर्यावरण विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.