प्रयागराज - प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याची सर्व तयारी झाली असून श्री पंचदशनाम आवाहन आखाड्याने राजेशाही अंदाजात या कुंभनगरीत रविवारी (ता.२२) प्रवेश केला. महंत, महामंडलेश्वर यांच्यासह अनेक संत आणि साधूंसह प्रवेश केलेल्या या आखाड्याचे महाकुंभमेळा प्रशासनाने विविध ठिकाणी पुष्पवर्षाव करून स्वागत केले.