PM Narendra Modi
PM Narendra Modi sakal

शिवांगी, जुई, जिया व स्वयम यांना राष्ट्रीय बाल पुरस्कार

पंतप्रधानांच्या हस्ते बाल वीरांना डिजिटल प्रमाणपत्र; विजेत्यांशी संवाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज यंदाच्या ‘पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२२’ च्या २९ विजेत्यांना ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे डिजिटल प्रमाणपत्र प्रदान केले. या विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील शिवांगी काळे, जुई केसकर, जिया राय आणि स्वयम पाटील या महाराष्ट्रातील चार जणांचा समावेश आहे. मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काही विजेत्या मुलांशी संवादही साधला.

PM Narendra Modi
Bank Fraud : ED ची मोठी कारवाई; जप्त केली 26.59 कोटींची रोकड, दागिने

विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी सहा श्रेणींमध्ये देशातील २९ बालकांची ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२२’ साठी निवड करण्यात आली. कोरोना संसर्गस्थितीमुळे या मुलांना दिल्लीत बोलावून पारितोषिक देणे आणि राजपथावरील संचलनातील त्यांचा सहभाग हे कार्यक्रम रद्द करावे लागले. २०२१ च्या ‘पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार’ विजेत्या ३२ बालकांनाही मोदी यांनी डिजिटल प्रमाणपत्र प्रदान केले. महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी आणि राज्यमंत्री मुंजपारा महेंद्र भाई हे यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. यंदाच्या विजेत्यांमध्ये जळगाव येथील शिवांगी काळे (वय ६), पुण्याची जुई केसकर (१५), मुंबईची जिया राय (१३) आणि नाशिकचा स्वयंम पाटील (१४ ) यांचा समावेश आहे. पदक, एक लाख रुपये आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

पंतप्रधान मोदी यांनी काही विजेत्यांशी संवादही साधला. पुरस्कार विजेत्या मुलांनी ‘व्होकल फॉर लोकल’ मोहिमेत सहभागी व्हावे, त्यातूनच आत्मनिर्भर भारत अभियानाला गती मिळेल, असा आग्रह मोदींनी केला. पंतप्रधान म्हणाले की, तुमच्या शौर्यगाथा ऐकून मलाही प्रोत्साहन मिळते. स्वच्छ भारत मोहिमेच्या यशाचे फार मोठे श्रेय देशाच्या बालशक्तीला जाते, असेही मोदी म्हणाले.

PM Narendra Modi
Young weather champion : प्राजक्ता कोळी साधणार तरुणांशी संवाद

उमा भारतींची आठवण

चंडीगडच्या तारूषी गौर हिने, जागतिक विजेती मुष्टियोद्धा मेरी कोम ही आपला आदर्श असल्याचे सांगितल्यावर मोदींनी, मेरी कोमबद्दल तुला काय माहिती आहे, असे विचारले. त्यावर तारूषी हिने, मला त्यांच्याबद्दल इतकी माहिती आहे की मी ती सांगू लागले तर वेळ पुरणार नाही, असे सांगताच पंतप्रधानांना हसू आवरेना. बाल रामायण लिहीणाऱ्या इंदूरच्या १२ वर्षीय अवि शर्मा याला मोदींनी, इतक्या लहान वयात रामायण लिहिलेस तेव्हा तुझे बालपण संपले की शिल्लक आहे? असे हसतहसत विचारले तेव्हा शर्मा याने, रामायणातून आपल्याला प्रेरणा मिळते असे उत्तर दिले. त्यावर पंतप्रधानांनी, फार वर्षांपूवी मी (भाजप नेत्या) उमा भारती यांचे बालवयातील प्रवचन ऐकून आश्चर्यचकित झालो होतो. मध्य प्रदेशाच्या मातीतच असे काही विलक्षण आहे, अशी आठवण जागविली.

महाराष्ट्रातील वीर

शिवांगी काळे, जळगाव : शौर्य श्रेणीत पुरस्कार. शिवांगी हिने धाडस आणि समयसूचकता दाखवून विजेच्या धक्क्यापासून आपल्या आई व बहिणीचे प्राण वाचविले.

जुई केसकर, पुणे : नवसंशोधन व नवाचार श्रेणीत पुरस्कार. जुईने पार्किन्सन आजारावर उपचारासाठी उपयुक्त ठरेल, असे उपकरण तयार केले. त्याला ‘जे ट्रेमर ३ जी’ असे नाव देण्यात आले आहे.

जिया राय, मुंबई : क्रीडा श्रेणीत निवड. ही दिव्यांग जलतरणपटू असून तिने ओपन वॉटर पॅरास्विमींग आणि ओपन वॉटर प्रकारात जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.

स्वयम पाटील, नाशिक : क्रीडा श्रेणीत निवड. जलतरणपटू स्वयमने वयाच्या १० व्या वर्षी पाच किलोमीटरचे, तर १३ व्या वर्षी १४ कि.मी.चे अंतर पार करून जागतिक विक्रम केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com