

Ayodhya Deepotsav
Sakal
प्रभू श्रीरामाची पावन भूमी असलेल्या अयोध्येत यंदाचा १० वा दीपोत्सव आतापर्यंतचा सर्वात भव्य, अलौकिक आणि जागतिक विक्रम रचणारा ठरणार आहे. येत्या ७ नोव्हेंबर रोजी राम की पैडीसह सरयू नदीच्या तब्बल ५६ घाटांवर एकाच वेळी ३० लाख मातीचे दिवे प्रज्वलित करून नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला जाणार आहे. मात्र, यंदाच्या दीपोत्सवाचे सर्वात मोठे आणि आंतरराष्ट्रीय आकर्षण ठरणार आहे ते थेट श्रीलंकेतून आलेले 'रावणेश्वरा' (Ravaneshwara) हे विशेष नाट्य सादरीकरण!