

Ayodhya 14 Kosi Parikrama Begins Devotees Undertake Sacred Journey Believed to Offer Freedom From 14 Worlds
esakal
अक्षय नवमीच्या पर्वानिमित्त रामनगरी अयोध्येत प्रसिद्ध १४ कोसी परिक्रमेची सुरुवात झाली आहे. सुमारे ४२ ते ४५ किलोमीटर लांबीची ही परिक्रमा पूर्ण करण्यासाठी देशभरातून भाविक अयोध्येत दाखल झाले आहेत. प्रभू श्रीरामांच्या १४ वर्षांच्या वनवासाचे स्मरण आणि धार्मिक श्रद्धेचा भाग म्हणून भाविक ही प्रदक्षिणा करतात. परिक्रमेच्या काळात होणारी गर्दी लक्षात घेऊन श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने रामललाच्या दर्शनाच्या वेळेतही वाढ केली आहे.
ही परिक्रमा १७ नोव्हेंबरच्या मध्यरात्री सुरू झाली असून २० नोव्हेंबरच्या पहाटे २ वाजून ५५ मिनिटांपर्यंत सुरू राहणार आहे. अनेक भाविक अनवाणी पायांनी हा प्रवास करतात. परिक्रमेपूर्वी सरयू नदीत स्नान करून संकल्प केला जातो.