वक्फ बोर्ड म्हणजे केवळ दुकानदारी! - एम. एच. खान (व्हिडिओ)

विशेष प्रतिनिधी
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

‘मुस्लिम वक्फ बोर्ड म्हणजे दुकानदारी आहे, त्याचा सामान्य मुस्लिम समाजाशी काही संबंध नाही. बरे झाले न्यायालयाने त्यांची दुकानदारी बंद केली,’ असे स्पष्ट मत लखनौमधील मुस्लिम समाजातील विचारवंत आणि कार्यकर्ते डॉ. एम. एच. खान यांनी ‘सकाळ’शी बोलताना मांडले.

अयोध्या - ‘मुस्लिम वक्फ बोर्ड म्हणजे दुकानदारी आहे, त्याचा सामान्य मुस्लिम समाजाशी काही संबंध नाही. बरे झाले न्यायालयाने त्यांची दुकानदारी बंद केली,’ असे स्पष्ट मत लखनौमधील मुस्लिम समाजातील विचारवंत आणि कार्यकर्ते डॉ. एम. एच. खान यांनी ‘सकाळ’शी बोलताना मांडले.

डॉ. खान गेल्या दोन दिवसांपासून अयोध्येत आहेत. कारसेवकपुरममध्ये रविवारी सकाळी ते आल्यावर ’सकाळ’ने त्यांच्याशी संवाद साधला. 

खान म्हणाले, ‘कोर्टाने हिंदू आणि मुस्लिम समाजाला निकालात न्याय दिला आहे. त्यामुळे हा विषय आता वाढवू नका. फेरविचार याचिका करून काही उपयोग होणार नाही.’

वक्फ बोर्ड मुस्लिम समाजाची दिशाभूल करीत आहे. उगाच भावना भडकावून दोन समाजांत तेढ निर्माण करीत आहे. या बोर्डला मुस्लिम समाजाची काळजी होती; तर तोंडी तलाक त्यांनी का नाही बंद केला?, असा प्रश्न उपस्थित करून आगामी काळात राम मंदिर आणि मशिद उभारणीत सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ayodhya case muslim wakf board shopping M H Khan Talking