

UP Tourism has announced a three-day Ayodhya Deepotsav 2026 package featuring Ram Temple visits, Saryu Aarti and the grand Deepotsav celebrations
esakal
अयोध्या दीपोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश पर्यटन विकास महामंडळाने (UPSTDC) देश-विदेशातील भाविक आणि पर्यटकांसाठी विशेष ‘दीपोत्सव अयोध्या’ टूर पॅकेज जाहीर केले आहे. ‘व्हिजिट माय स्टेट’ अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेल्या या पॅकेजची मुदत २ रात्री आणि ३ दिवस असून, प्रति व्यक्ती रु. १६,९९९ शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशचे पर्यटन व संस्कृती मंत्री जयवीर सिंह आणि UPSTDCचे अध्यक्ष अमृत अभिजात यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, दिल्ली तसेच दक्षिण भारतासह देशाच्या विविध भागांतील पर्यटकांना अयोध्येतील दीपोत्सवाचा अनुभव सहज घेता यावा, या उद्देशाने हे पॅकेज तयार करण्यात आले आहे.