Ayodhya Food: अयोध्या स्टाईल ब्रेकफास्ट करायचाय? राम मंदिर दर्शनानंतर या ठिकाणी फूड लव्हर्स नक्की जातात; कारण आहे 'महावीर टिक्की'

Mahavir Tikki – Ayodhya's Iconic Street Food: अयोध्याचे पथविक्रेत्यांचे खाद्यपदार्थ मधील ही ७५ वर्षांची पारंपरिक टिक्की राम मंदिर दर्शनानंतर चाखण्यासाठी पर्यटकांची पहिली पसंती ठरत आहे.
Ayodhya Food

Ayodhya Food

esakal

Updated on

प्रभू श्रीरामांची नगरी अयोध्या धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्वासाठी जगभर प्रसिद्ध आहे. मात्र, येथील खाद्यसंस्कृतीही पर्यटकांना तितकीच आकर्षित करते. गरमागरम कचोरी, कुल्हडमधील दही-जलेबी आणि प्रसिद्ध पेढ्यांप्रमाणेच अयोध्येची 'महावीर टिक्की' ही राज्यभर लोकप्रिय आहे.

उत्तर प्रदेश सरकारच्या 'एक जनपद-एक व्यंजन' उपक्रमातही या पारंपरिक पदार्थाचा समावेश करण्यात आला आहे.

रिकाबगंज परिसरातील मुकेरी टोला येथील एका छोट्याशा गल्लीत असलेले हे दुकान १९५० पासून सुरू आहे. गेली ७५ वर्षे या दुकानाची चव कायम असून, सध्या अमितजी आपल्या कुटुंबाची ही परंपरा पुढे नेत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com