Ayodhya Heritage Trail: दीपोत्सवापूर्वी अयोध्येत भाविकांसाठी ६ तासांची विशेष धार्मिक सहल; १४ कोसी परिक्रमा मार्गावरील मंदिरांचे घडणार दर्शन

Ramayana Wax Museum to Sarayu Aarti : दीपोत्सवापूर्वी उत्तर प्रदेश पर्यटन विकास महामंडळाने अयोध्येत सहा तासांची विशेष धार्मिक सहल सुरू केली आहे. वातानुकूलित वाहन आणि स्थानिक गाईडच्या मदतीने १४ कोसी परिक्रमा मार्गावरील प्रमुख मंदिरे, ऐतिहासिक स्थळे आणि घाटांचे दर्शन घेता येणार आहे.
Devotees can explore Ayodhya’s temples and heritage sites through a six-hour guided tour.

Devotees can explore Ayodhya’s temples and heritage sites through a six-hour guided tour.

esakal

Updated on: 

उत्तर प्रदेश: अयोध्येतील दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविक आणि पर्यटकांसाठी उत्तर प्रदेश राज्य पर्यटन विकास महामंडळाने (UPSTDC) 'अयोध्या डिव्हाइन हेरिटेज ट्रेल' ही विशेष पर्यटन सहल सुरू केली आहे. या एकदिवसीय सहलीत अवघ्या सहा तासांत अयोध्येतील प्रमुख मंदिरे, ऐतिहासिक स्थळे आणि पौराणिक घाटांचे दर्शन घेता येणार आहे. स्थानिक अनुभवी गाईडच्या मार्गदर्शनाखाली वातानुकूलित वाहनातून ही यात्रा घडवली जाणार आहे. १ नोव्हेंबरपासून ही सेवा सुरू झाली आहे.

Loading content, please wait...