

Jhulanotsav in Ayodhya Why Lord Ram and Sita Are Placed on the Swing Know the Ancient Tradition
esakal
श्रावण महिना सुरू होताच प्रभू श्रीरामाची नगरी अयोध्या पुन्हा एकदा उत्सवाच्या रंगात न्हाऊन निघाली आहे. अयोध्येतील ऐतिहासिक रंगमहल मंदिरापासून प्रसिद्ध झुलनोत्सवाला सुरुवात झाली आहे. सायंकाळी आरतीनंतर प्रभू श्रीराम आणि माता सीता यांच्या मूर्ती सुंदर सजवलेल्या झुल्यावर विराजमान करण्यात आल्या. या काळात अयोध्येतील मंदिरांमध्ये दररोज विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरात भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे.