Viral Video: सातासमुद्रापारचा रामभक्त! जर्मन चिमुकल्याचा ‘राम-राम’ जप ऐकून भाविक भावुक, संस्कृत जपाने नेटकरी फिदा

German Child Devotee Charms Ayodhya Ram Temple: अयोध्येत सात वर्षांचा जर्मन चिमुकला अंजनेय रामललाच्या दर्शनासाठी पोहोचला आणि शुद्ध संस्कृत ‘राम-राम’ जप करत भाविकांचे हृदय जिंकले.
Viral Video

Viral Video

esakal

Updated on

देश: अयोध्येच्या राम मंदिरात रविवारी एका सात वर्षांच्या चिमुरड्याने सर्वांची मने जिंकली. जर्मनीतून आलेला हा नन्हा रामभक्त- अंजनेय, जेव्हा रामललाच्या दरबारात पोहोचला, तेव्हा त्याची ओढ आणि भक्ती पाहून तिथे उपस्थित असलेले भाविक थक्क झाले. सध्या या चिमुरड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेला आणि कपाळावर टिळा लावलेला अंजनेय दिसायला अगदी साधा होता, पण त्याचे उच्चार मात्र कमालीचे होते. परदेशी असूनही तो ज्या पद्धतीने शुद्ध संस्कृत लहेजामध्ये 'राम-राम' असा जप करत होता, ते ऐकून अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com