esakal | राम मंदिर भूमीपूजन : लालकृष्ण अडवानी यांची भावनिक प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

LKadvani

राम मंदिरासाठी देशभरातून रथयात्रा काढणारे, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया दिली आहे. अडवानी या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत.

राम मंदिर भूमीपूजन : लालकृष्ण अडवानी यांची भावनिक प्रतिक्रिया

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अयोध्येत आज, राम मंदिराचा भूमीपूजन सोहळा होत आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. राम मंदिरासाठी देशभरातून रथयात्रा काढणारे, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया दिली आहे. अडवानी या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. परंतु, हा सोहळा आपल्यासाठी ऐतिहासिक आणि भावनिक असल्याचं अडवानी यांनी म्हटलंय. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय म्हणाले अडवानी?
भूमीपूजन सोहळ्यासाठी अडवानी यांना निमंत्रण दिले की नाही यावरून गेल्या दोन-तीन दिवसांत राजकीय वर्तुळात चर्चा झाली होती. परंतु, अडवानी यांचे वय आणि कोरोनाचा सुरू असलेला प्रसार पाहता, अडवानी यांची सोहळ्यातील उपस्थिती टाळण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. परंतु, 1980-90च्या दशकात राजमंदिर मोहिमेचा चेहरा असलेले अडवानी यांनी आजचा दिवस महत्त्वाचा असल्याचं सांगितलंय.

अडवानी म्हणाले, 'केवळ माझ्यासाठीच नाही तर, तमाम भारतीयांसाठी हा सोहळा म्हणजे ऐतिहासिक आणि भावनिक क्षण आहे.  मला खात्री आहे, की भारतीयांना सदाचार आत्मसात करण्यासाठी हे मंदिर प्रेरणा देईल. राम मंदिरामुळं भारत स्वतःला मजबूत, संपन्न, शांततापूर्ण आणि मधूर देश म्हणून सिद्ध करेल. सर्वांना न्याय मिळेल आणि खऱ्या अर्थाने राम राज्य प्रत्यक्षात उतरवू.' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सुदैवाने 1990मध्ये सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा काढण्याची संधी मला मिळाली. ज्यामुळे अनेक सहभागींच्या आकांक्षांना एक वेगळीच ऊर्जा मिळण्यास मदत झाली. 
- लालकृष्ण अडवानी, नेते भाजप

अडवानी झाले होतो कोर्टापुढे हजर
बाबरी मशीद पाडल्याप्रकरणात लालकृष्ण अडवानी यांनाही कोर्टापुढे हजर व्हावे लागले होते. गेल्या आठवड्यात लखनौच्या सीबीआय कोर्टापुढे अडवानी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर झाले होते. साडेचार तासांत अडवानी यांना एक हजारहून अधिक प्रश्न विचारण्यात आले होते. त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावण्यात आल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली.