Ayodhya Ram Mandir : प्राणप्रतिष्ठेपर्यंत पंतप्रधानांचा उपवास; व्रताच्या नियमांनुसार दैनंदिन कार्यक्रम

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाबद्दल देश-विदेशातून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे माझे हृदय भरून आल्याचे त्यांनी आज सांगितले.
ayodhya ram mandir prana pratishtha pm narendra modis 11 days fast
ayodhya ram mandir prana pratishtha pm narendra modis 11 days fastesakal

नवी दिल्ली : येत्या २२ जानेवारीला अयोध्येत राममंदिरात होणाऱ्या श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी ११ दिवस, म्हणजे आजपासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी उपवास व्रताचे पालन करणार आहेत. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाबद्दल देश-विदेशातून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे माझे हृदय भरून आल्याचे त्यांनी आज सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी एक ऑडिओ संदेश ‘एक्स’ या सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. ‘‘प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम हा माझ्यासह देशातील १४० कोटी लोकांच्या श्रद्धेची पूर्तता आहे. अयोध्येतील या सोहळ्याला अवघे ११ दिवस उरले आहेत.

या काळात उपवास व्रत करणार असून या व्रताच्या नियमांनुसारच दैनंदिन कार्यक्रम आखणार आहे,’’ असे मोदींनी संदेशात म्हटले आहे. ‘मागील ५०० वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षांची परिपूर्ती पाहण्याचे भाग्य मला मिळाले आहे.

गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा करण्याच्या येणाऱ्या क्षणामुळे मी रोमांचित झालो आहे. ही केवळ निमित्तमात्र असून माझ्या माध्यमातून देशातील तमाम लोकांच्या भावना व्यक्त होत आहेत,’ असेही त्यांनी या संदेशात म्हटले आहे.

यावेळी त्यांनी राममंदिराच्या संघर्षामध्ये अनेकांनी दिलेल्या बलिदानाचाही उल्लेख केला. अनेक अनभिज्ञ लोकांनी या राममंदिराच्या संघर्षात आपले योगदान दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

राजमाता जिजाऊंचे स्मरण

पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये आज येण्याच्या काही तास आधी प्रसिद्ध झालेल्या संदेशात त्यांनी काळाराम मंदिर, राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदाचे स्मरण केले. व्रताची सुरुवात करताना आपण आज नाशिकमध्ये असणे हा योगायोग असल्याचे ते म्हणाले.

‘‘वनवासाच्या काळात प्रभू श्रीरामांनी बराच काळ या परिसरात व्यतीत केला आहे. अशा या पुनीत भूमीमध्ये आज माझी उपस्थिती राहणार आहे. आज राजमाता जिजाऊंची जयंती आहे. माँ जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांसारख्या महामानवाला जन्म दिला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने अनेकांना प्रेरणा दिली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या भूमीत येऊन जिजाऊंचे स्मरण करताना आनंद होत आहे,’’ असे मोदींनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com