

Ram Darbar Renamed as Ram Parivar in Ayodhya
Sakal
उत्तर प्रदेश : अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या प्रथम मजल्यावर प्रस्थापित असलेल्या प्रभू श्रीरामांच्या दरबाराला आता अधिकृतपणे 'राम परिवार' असे नवीन नाव देण्यात आले आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने या संदर्भातील निर्णय घेतला असून, आता भाविकांना मिळणाऱ्या दर्शनाच्या पासवरही 'राम दरबार' ऐवजी 'राम परिवार' असे नमूद करण्यात येत आहे.