

Ayodhya Utsav 2025
sakal
Ram Mandir Pran Pratishtha Anniversary : अयोध्या राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा दुसरा वर्धापन दिन आज मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. या 'प्रतिष्ठा द्वादशी' सोहळ्यासाठी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येत उपस्थित राहणार आहेत.
या विशेष प्रसंगी राम मंदिर परिसरात बांधलेल्या सहा मंदिरांपैकी एक असलेल्या माता अन्नपूर्णा देवीच्या मंदिराच्या शिखरावर संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्या नगरीत अभेद्य सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, परिसराचे पाच झोन आणि दहा सेक्टरमध्ये विभाजन करण्यात आले आहे.