

Ayodhya Ram Mandir
esakal
देश: चैत्र नवरात्रीच्या आणि हिंदू नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अयोध्येत एक ऐतिहासिक आणि अध्यात्मिक सोहळा पार पडला. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी राम मंदिर संकुलात अत्यंत पवित्र अशा 'श्रीराम यंत्रा'ची विधिवत प्रतिष्ठापना केली. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल देखील उपस्थित होत्या.