

Ayodhya
esakal
अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी आता तासनतास रांगेत उभे राहण्याची गरज नाही. राम मंदिर ट्रस्टने भाविकांसाठी 'विशेष पास' (Special Pass) सुविधा सुरू केली आहे, ज्याद्वारे तुम्ही गर्दी टाळून कमी वेळेत आणि सुलभतेने दर्शन घेऊ शकता.
मिळालेल्या माहितीनुसार, दर्शनासाठी असलेल्या नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. भाविकांच्या सोयीसाठी रेल्वेच्या धर्तीवर आता 'तत्काळ पास'ची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.