Ayodhya Surya Tilak : तीन मजली मंदिर, अन् ग्राउंड फ्लोअरवर रामलल्ला.. तरीही मूर्तीवर पडणार सूर्याची किरणं! कसं होणार शक्य?

Ram Navami 2024 : पौराणिक कथांनुसार, जेव्हा श्रीरामाचा जन्म झाला होता, तेव्हा सूर्यदेवाने त्यांचा अभिषेक केला होता.
Ayodhya Surya Tilak
Ayodhya Surya TilakeSakal

Ayodhya Ram Mandir Surya Tilak : आज देशभरात रामनवमीचा उत्साह पहायला मिळत आहे. या निमित्ताने अयोध्येतील श्रीराम मंदिरात भव्य सूर्याभिषेक सोहळ्याचं आयोजन केलं आहे. अयोध्येतील राममंदिराच्या स्थापनेनंतरची ही पहिलीच रामनवमी आहे. त्यामुळे जगभरातील प्रत्येक रामभक्ताला आज रामलल्लाचं दर्शन घेण्याची ओढ लागली आहे.

दुपारी 12 वाजून 16 मिनिटांनी सूर्याची किरणं थेट रामलल्लाच्या मस्तकाला स्पर्श करतील. पुराणामध्ये सांगितलं आहे, की जेव्हा श्रीरामाचा जन्म झाला होता, तेव्हा सूर्यदेवाने त्यांचा अभिषेक केला होता. तोच क्षण आज पुन्हा अनुभवण्यास मिळेल. मात्र, तीन मजली राम मंदिरातील ग्राउंड फ्लोअरवर रामलल्ला आहेत. अशात त्यांच्या मस्तकावर सूर्याची किरणं पडणं कसं शक्य होईल? जाणून घेऊया.

काय आहे तंत्रज्ञान?

CSIR-CBRI रुडकीचे वैज्ञानिक डॉ. एस. के. पाणिग्रही यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत यामागचं विज्ञान सांगितलं आहे. यासाठी त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्सच्या मदतीने नवीन तंत्रज्ञान विकसित केलं आहे. यामध्ये तीन आरसे आणि एका लेन्सचा वापर करण्यात आला.

Ayodhya Surya Tilak
Ram Navami 2024 : अयोध्येत रामनवमीचा उत्साह; शरयू नदीवर भाविकांची मोठी गर्दी, 12:16 वाजता होणार सूर्य तिलक

या ऑप्टो-मेकॅनिकल सिस्टीममध्ये हे आरसे आणि लेन्स एका पाईपिंग सिस्टीममध्ये फिट करण्यात येतात. यामुळे तिसऱ्या मजल्यावर पडणारी सूर्याची किरणे ही गर्भगृहाच्या दिशेने वळवणं शक्य होतं. आरशांच्या मदतीने सूर्यकिरणे गर्भगृहापर्यंत पोहोचवल्यानंतर शेवटी लेन्सच्या मदतीने सूर्यप्रकाश रामलल्लांच्या कपाळावर केंद्रित केला जाईल. या माध्यमातून रामलल्लाच्या कपाळी सूर्य-तिलक लावला जाईल.

दरवर्षी शक्य होणार तिलक

या तंत्रज्ञानात वापरलेले सर्व पाईपिंग आणि इतर भाग पितळेचे आहेत. तसंच, आरसे आणि लेन्स देखील अगदी उच्च प्रतीचे आहेत. हा एकूण सेटअप कित्येक वर्षे टिकणारा आहे. त्यामुळे दर वर्षी चैत्र महिन्यातील रामनवमी दिवशी दुपारी 12 वाजेपासून रामलल्लांच्या मस्तकावर सूर्य-तिलक लावता येईल.

अयोध्येतील रामलल्लाच्या सूर्याभिषेक सोहळ्याला तुम्ही घरबसल्या देखील पाहू शकता. दूरदर्शनवरुन याचं थेट प्रक्षेपण करण्यात येईल. यासोबतच, श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र संस्थानाच्या यूट्यूब चॅनलवरही तुम्ही हा सोहळा पाहू शकाल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com