Ayodhya Ram Mandir : राम मंदिराच्या उभारणीस बंगालचाही हातभार

उत्तरप्रदेशातील अयोध्यानगरी राममंदिराच्या भव्य वास्तूच्या उद्‍घाटन सोहळ्यासाठी सजू लागली असून येत्या २२ जानेवारी रोजी होत असलेल्या या सोहळ्याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे.
Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram MandirSakal

- श्यामल रॉय

कोलकता - उत्तरप्रदेशातील अयोध्यानगरी राममंदिराच्या भव्य वास्तूच्या उद्‍घाटन सोहळ्यासाठी सजू लागली असून येत्या २२ जानेवारी रोजी होत असलेल्या या सोहळ्याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. या मंदिराच्या वास्तूमध्ये सोळा फूट उंचीच्या दोन फायबरच्या रामाच्या मूर्ती स्थापित करण्यात येणार असून त्यांची निर्मिती पश्चिम बंगालमधील मूर्तिकार जमालुद्दीन आणि त्यांचा मुलगा बिट्टू यांनी केली आहे.

हे दोघेही पश्चिम बंगालमधील उत्तर २४- परगणा या जिल्ह्यातील रहिवासी आहेत. प्रत्यक्ष मूर्तिकला शिकल्यानंतर जमालुद्दीन अनेक वर्षांपासून हैदराबादेतील ‘रामोजी फिल्म सिटी’मध्ये काम करत होते. येथील काम सोडल्यानंतर ते दत्तपुकूर येथे परतले. तिथेच त्यांना दुर्गा, काली आणि अन्य हिंदू देवदेवतांच्या मूर्ती तयार करायला सुरुवात केली. पुढे त्यांनी मुलगा बिट्टूलाही मूर्तिकलेचे प्रशिक्षण दिले.

सध्या देशातील पाच राज्यांमध्ये जमालुद्दीन यांच्या मूर्तिकलेचे साम्राज्य पसरले आहे. विशेष म्हणजे यांच्या मित्रानेच त्यांना दोन वर्षापूर्वी रामाची मूर्ती तयार करण्याची सूचना केली होती. मित्राचे म्हणणे पटल्यानंतर त्यांनी दत्तपुकूर येथील राम मंदिर ट्रस्टला भेट देऊन याबाबत विचारणा केली होती. तशी चित्रेही त्यांनी मंदिर समितीकडे सादर केली होती.

त्यातील दोन चित्रांना मान्यता देण्यात आली आहे. ते आणि त्यांचा मुलगा मागील दीड वर्षांपासून या दोन मूर्तीच्या निर्मितीवर काम करत होते. या कामाचा मोबदला म्हणून त्यांना पाच लाख ३० हजार रुपये एवढी रक्कम मिळाली आहे.

मी तयार केलेल्या दोन मूर्तींना आता अयोध्येतील राम मंदिरामध्ये स्थान मिळणार असल्याने मला अतीव आनंद झाला आहे. काम करताना कोठेही आम्ही धर्माचा विचार केला नाही. कामासाठी आम्ही या सगळ्याच्या पुढे गेलो आहोत. ज्या दिवशी या दोन मूर्ती मंदिरात बसविण्यात येतील तेव्हा त्याचा व्हिडिओ मला पाठवा अशी विनंती मी मंदिर समितीकडे केली आहे.

- जमालुद्दीन, मूर्तिकार

तमिळनाडूच्या नमक्कलमधील घंटा

कोची - तमिळनाडूतील ट्रान्सपोर्ट हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नमक्कल जिल्ह्यामध्ये अयोध्येतील राम मंदिरासाठी अत्यंत सुंदर आणि आखीव-रेखीव अशा ४२ घंटा तयार करण्यात आल्या आहेत. या घंटांच्या निर्मितीसाठी येथील २५ कलाकार हे अहोरात्र मेहनत घेते. विशेष म्हणजे नमक्कलमध्ये तयार करण्यात येणाऱ्या घंटा या देशभर प्रसिद्ध आहेत.

या सगळ्या ४२ घंटांचे मिळून वजन हे १ हजार २०० किलोग्रॅम एवढे आहे. येथे पूजाअर्चा केल्यानंतर या घंटा अयोध्येला पाठविण्यात येणार आहेत. ४२ पैकी प्रत्येकी पाच घंटांचे वजन हे १२० किलोग्रॅम एवढे असून सहा घटांचे ७० किलोग्रॅम तर अन्य घंटांचे वजन प्रत्येकी २५ किलोग्रॅम एवढे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com