Ayodhya: अयोध्येत सापडला ३०० वर्ष जुना खजिना! हाताने लिहिलेली 'रामचरितमानस'ची दुर्मिळ प्रत समोर; सरकारने घेतला मोठा निर्णय

Discovery of the 300-Year-Old Ramcharitmanas Manuscript: अयोध्येत ३०० वर्ष जुनी हस्तलिखित रामचरितमानसची पांडुलिपी सापडली; संग्रहालयात जतन, ऐतिहासिक आणि धार्मिक अभ्यासासाठी अमूल्य ठेवा.
Ayodhya

Ayodhya

esakal

Updated on

अयोध्येच्या ऐतिहासिक वारशात आता एका सुवर्ण अध्यायाची भर पडली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या मौल्यवान ठेव्याचा शोध घेतला जात होता, तो अखेर सापडला आहे. सुमारे ३०० वर्षे जुनी आणि हाताने लिहिलेली (हस्तलिखित) रामचरितमानसची दुर्मिळ पांडुलिपी आता अयोध्येच्या आंतरराष्ट्रीय रामकथा संग्रहालयाची शोभा वाढवणार आहे.

अयोध्येतून समोर आलेली ही बातमी केवळ भाविकांसाठीच नाही, तर इतिहासकार आणि संशोधकांसाठीही आनंदाची पर्वणी ठरली आहे. 'पांडुलिपी संरक्षण यज्ञ' या विशेष मोहिमेअंतर्गत हा अमूल्य ठेवा उजेडात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com