

ram mandir darshan special pass
esakal
प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर आता भाविकांना त्याच परिसरात असलेल्या इतर १४ उप-मंदिरांचे दर्शन घेण्याची ओढ लागली आहे. ही ओढ लक्षात घेऊन श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून ही सर्व मंदिरे भाविकांसाठी खुली करण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, येथे होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता आता 'पास' असल्याशिवाय या उप-मंदिरांमध्ये प्रवेश मिळणार नाही.