अयोध्या प्रकरणावर आता 'या' तारखेला होणार सुनावणी

वृत्तसंस्था
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

न्या. ललित यांच्या माघारीनंतर नव्या घटनापीठाची स्थापना 

न्या. यू. यू. ललित यांनी या खटल्यातून यापूर्वी माघार घेतली. त्यानंतर सरन्यायाधीश गोगोई यांनी नव्याने घटनापीठाची स्थापना यांनी केली.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाकडून बहुचर्चित अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली. अयोध्या प्रकरणाबाबत दाखल झालेल्या सर्व याचिकांवर आता येत्या 26 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. याबाबत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील 5 न्यायमूर्तींचे घटनापीठाकडून या खटल्यावर सुनावणी होणार आहे.

यापूर्वी अयोध्या प्रकरणावर 29 जानेवारीला सुनावणी होणार होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठातील सदस्य न्या. एस. ए. बोबडे रजेवर असल्याने याप्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. आता न्या. बोबडे रजेवरून पतरले आहेत. त्यामुळे अयोध्या खटल्यावरील सुनावणी आता 26 फेब्रुवारीला घेण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, सरन्यायाधीश गोगोई, न्या. डी. वाय. चंद्रचूड, न्या. एस. अब्दुल नजीर, न्या. एस. ए. बोबडे आणि न्या. अशोक भूषण यांचा समावेश नव्या घटनापीठात करण्यात आला आहे.

न्या. ललित यांच्या माघारीनंतर नव्या घटनापीठाची स्थापना 

न्या. यू. यू. ललित यांनी या खटल्यातून यापूर्वी माघार घेतली. त्यानंतर सरन्यायाधीश गोगोई यांनी नव्याने घटनापीठाची स्थापना यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ayodhya verdict now will be hearing on 26 February