
नवी दिल्ली - कोरोनाच्या संसर्गामुळे जागतिक अर्थकारणात मोठी उलथापालथ झाली असून याचे सर्वच घटकांवर दूरगामी परिणाम झाले आहेत. जगातील बहुतांश अभ्यासक हे या संकटापासून सर्वानीच योग्य तो धडा घेत व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणावेत असे मत मांडत असतानाच देशातील आघाडीच्या व्यवस्थापन आणि उद्योगाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनी कोरोनाच्या आपत्ती काळाचा आपल्या अभ्यासक्रमात समावेश करायला सुरवात केली आहे.
या घटकांचा समावेश
अर्थव्यवस्थेवरील परिणाम, घरातून काम केल्याने मनुष्यबळ व्यवस्थापनाचे बदलेले पैलू, किमतीवरील नियंत्रण, शाश्वतता, स्थानिक घटक, नैसर्गिक संकट आणि अन्य आपत्तीच्या काळातील उद्योग धोरणाची आखणी, जोखीम व्यवस्थापन, अनिश्चिततेच्या काळातील निर्णय घेण्याची क्षमता.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
मागील काही दिवसांत झालेल्या बदलांची आम्ही गांभीर्याने नोंद घेतली आहे, या आपत्ती काळाचा आर्थिक उद्योग धोरणात कसा समावेश करायचा याचा मार्केटिंग आणि रणनीतीची आखणी आदींमध्ये समावेश केला जाईल.
अंजु सेठ, संचालक, आयआयएम कोलकाता
बिझिनेस स्कूल या नात्याने आमची ही जबाबदारी आहे की आम्ही उद्योगांना आणि त्यांच्या व्यवस्थापकांना मार्गदर्शक ठरू शकेल अशा आशयाची निर्मिती करावी. अशा वेळी आंतरविद्याशाखीय घटकांची देखील मदत घेणे आवश्यक ठरते. कोरोनासारख्या संकटावर कशा पद्धतीने मात करायची याचा तयार आराखडा सध्याच्या शैक्षणिक अभ्याक्रमांतून मिळत नाही.
प्रो. विपुल माथूर, इन्स्टिट्युट इकॉनॉमिक ग्रुप
कोरोनाच्या संसर्गाचा स्टार्टअप, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, उद्योग, आरोग्य यंत्रणा आणि शिक्षण यांच्यावर नेमका काय परिणाम होतो याचा आम्ही अभ्यास करत आहोत. आमच्या संस्थेतील काही मंडळी सध्या याअनुषंगाने संशोधन निबंधांवर काम करत असून पुढे ते शोध नियतकालिकांत प्रसिद्ध होतील.
जी. रघुराम, संचालक आयआयएम बंगळूर
कॉर्पोरेट जगामध्ये काही मोठे बदल होऊ घातले आहेत, विद्यार्थ्यांनी त्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. कारण या संकटानंतर उद्योगासमोर अनेक मोठी संकटे उभी राहणार आहेत.
रूपमंजिरी सिन्हा रे, सहाय्यक प्राध्यापक, मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिटयूट
यांच्याकडून अभ्यास सुरू
आयआयएम (लखनौ), आयआयएम (इंदूर)
यांचा प्रतिसाद नाही
आयआयएम (रायपूर), आयआयएम (संभळपूर)
नवी आर्थिक आव्हाने
- सोशल डिस्टंसिन्गमुळे थांबलेली आर्थिक वाढ
- कामगारांचे उलट स्थलांतर
- वाढलेली बेरोजगारी आणि घटलेले उत्पन्न
- गुंतवणूक आणि तरलतेमधील आव्हाने
- सार्वजनिक धोरणातील बदल
- घसरलेला जागतिक व्यापार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.