म्हणून मोदींना नेटीझन्स म्हणतायेत; बाकी सब ठीक है !

टीम ईसकाळ
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

देशात फक्त बेरोजगारी आहे, बाकी सर्व ठिक आहे. देशात फक्त झुंडबळीच्या घटना घडत आहेत. बाकी सगळे ठिक आहे, अशा प्रकारचे अनेक ट्विट ट्विटरवर करण्यात आले आहेत.

पुणे : बेरोजगारी, कमी पगार, झुंडबळीच्या घटना, काश्मीरमध्ये टाळेबंदी, सद्य स्थितीत असलेल्या नोकऱ्या संपण्याची भीती आणि विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात डांबणं हे मुद्दे सोडले तर देशात सगळं काही छान चाललं आहे. असे ट्विट माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केलं आहे. यानंतर ट्विटरवर #BaakiSabTheekHai या नावाने हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे.
 

अनेकांनी ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये काँग्रेस पक्षाकडून सातत्याने ट्विट करून प्रश्न केले जात आहेत. देशात फक्त बेरोजगारी आहे, बाकी सर्व ठिक आहे. देशात फक्त झुंडबळीच्या घटना घडत आहेत. बाकी सगळे ठिक आहे, अशा प्रकारचे अनेक ट्विट ट्विटरवर करण्यात आले आहेत.

 

दरम्यान, पी. चिदंबरम यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन हे ट्विट करण्यात आलं आहे. पी. चिदंबरम यांनी त्यांच्या वतीने त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करण्याची मुभा दिली आहे. त्यांचे कुटुंबीय चिदंबरम यांचं म्हणणं ट्विटरवर मांडू शकतात. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BaakiSabTheekHai trend on Twitter