Baba Ramdev: योगगुरु बाबा रामदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल; मुस्लिमांविरोधातील विधान भोवलं

रामदेव यांनी गेल्या काही दिवसात अनेकदा वादग्रस्त विधानं केली आहेत.
Yoga Guru Baba Ramdev News
Yoga Guru Baba Ramdev News esakal

मुंबई : योगगुरु बाबा रामदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुस्लिमांविरोधात केलेलं वादग्रस्त विधान त्यांना भोवलं आहे. राजस्थानातील बारमेर इथं एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी २ फेब्रुवारी रोजी हे विधान केलं होतं. याप्रकरणी रामदेव यांच्याविरोधात काल गुन्हा दाखल झाला होता. (Baba Ramdev booked for hate speech at Rajstan Bamner)

राजस्थानातील चौहाटन पोलीस ठाण्यात १५३ अ अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे. बाबा रामदेव यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, मुस्लिम आणि ख्रिश्चनांमधील काही लोकांना संपूर्ण जगाला त्यांच्या धर्मात घेण्याचं वेड लागलं आहे. पण हिंदू धर्म आपल्या अनुयायांना चांगलं वागण्यास शिकवतो. मुस्लिम लोक दिवसातून पाच वेळा नमाज पठण करतात त्यानंतर त्यांना पाहिजे ते करतात. ते हिंदू मुलींचं अपहरण करतात आणि त्यांच्यासोबत सर्व प्रकारचे पाप करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com