योगगुरू बाबा रामदेवांची वाढणार डोकेदुखी! 'कोरोनिल'वरील दाव्याची होणार पोलिस चौकशी | Desh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

योगगुरू बाबा रामदेवांची वाढणार डोकेदुखी! 'कोरोनिल'वरील दाव्याची होणार पोलिस चौकशी
योगगुरू बाबा रामदेवांची वाढणार डोकेदुखी! 'कोरोनिल'वरील दाव्याची होणार पोलिस चौकशी

बाबा रामदेवांची वाढणार डोकेदुखी! 'कोरोनिल'वरील दाव्याची होणार चौकशी

योगगुरू बाबा रामदेव (Yoga Guru Baba Ramdev) आणि आचार्य बाळकृष्ण (Acharya Balkrishna) यांच्याविरोधात दाखल झालेल्या तक्रारीबाबत पुणे (Pune) जिल्ह्यातील न्यायालयाने (Court) पोलिसांना अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या तक्रारीत आरोप करण्यात आला आहे, की योगगुरूंनी पतंजलीचे (Patanjali) उत्पादन 'कोरोनिल' (Coronil) हे कोरोना विषाणूवर (Covid-19 Virus) उपचार करू शकते, असा खोटा दावा केला होता. (Baba Ramdev's Coronil drug produced by Patanjali will be investigated by the police)

हेही वाचा: 50 लाख जिंकण्याची सुवर्णसंधी! तुमची एक कल्पना बनवेल तुम्हाला करोडपती

जुलै 2020 मध्ये जुन्नर येथील प्रथमवर्ग न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर ऍड. मदन कुरहे (Advocate Madan Kurhe) यांनी तक्रार दाखल केली होती. न्यायदंडाधिकारी (प्रथमवर्ग) पी. व्ही. सपकाळ (P. V. Sapkal) यांनी आपल्या आदेशात जुन्नर पोलिस ठाण्याला (Junnar Police Station) 7 फेब्रुवारीपर्यंत या प्रकरणी अहवाल देण्यास सांगितले आहे. न्यायाधीशांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, संशयित आरोपी या न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राबाहेरील ठिकाणी राहात असल्याचे रेकॉर्डवरून दिसून येते. त्यामुळे या घटनेच्या पुढे जाण्यासाठी पुरेसे आधार आहेत का, याचा तपास करावा लागेल. अशा स्थितीत संशयित आरोपींवरील कारवाईला स्थगिती देणे आणि गुन्ह्याचे स्वरूप पाहता, संबंधित पोलिस ठाण्याला निर्देश देणे आवश्‍यक आहे. या आदेशात पुढे म्हटले आहे की, जुन्नर पोलिस ठाण्याच्या संबंधित अधिकाऱ्याला फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) कलम 202 (प्रक्रिया जारी करण्यास स्थगिती) अंतर्गत 7 फेब्रुवारी रोजी किंवा त्यापूर्वी या न्यायालयात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

कुरहे यांनी त्यांच्या तक्रारीत दावा केला होता, की पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव आणि व्यवस्थापकीय संचालक बाळकृष्ण यांनी त्यांच्या 'कोरोनिल' आणि 'श्वासारी' या उत्पादनांद्वारे कोविड-19 वर शंभर टक्के उपचार विकसित केल्याचे प्रसारमाध्यमांमध्ये जाहीर केले होते. तक्रारीत म्हटले आहे की, आयुष मंत्रालयाने (Ayush Ministry) पतंजलीला योग्य पडताळणी होईपर्यंत औषधांची जाहिरात किंवा विक्री करण्यापासून परावृत्त करण्यास सांगितले होते. तक्रारदाराने पुढे म्हटले आहे, की वैधानिक अधिकाऱ्यांकडून योग्य पडताळणी आणि मंजुरीपूर्वी कोविड-19 चे प्रकाशन आणि उपचारांच्या शोधाबद्दल एकतर्फी दावे "खोट्या दाव्या"च्या कक्षेत येतात.

हेही वाचा: डिसेंबरमध्ये 'या' राज्यातील लोकांनी रिचवली 50 हजार लिटर दारू!

कुरहे यांनी आरोप केला की, संशयित आरोपींनी एकत्रितपणे, सामान्य गुन्हेगारीच्या हेतूने पतंजलीचे औषध सादर केले आणि त्याचा प्रचार केला तसेच यापूर्वीच कोणत्याही पडताळणीशिवाय औषधाची जाहिरात करून अनेक कायद्यांचे उल्लंघन केले आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, कोविड-19 महामारीमुळे जग दहशतीच्या सावटातून जात असताना केवळ व्यवसाय करण्याच्या उद्देशाने लोकांमध्ये खोट्या आशा निर्माण करण्यासाठी संशयित आरोपी आणि त्यांच्या कंपनीकडून बेजबाबदार कृत्ये करण्यात आली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top