

badal babu pakistan parents going to meet modi
sakal
Badal Babu case: फेसबुकवरील प्रेमासाठी सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या उत्तर प्रदेशातील 'बादल बाबू'ची कहाणी आता एका गंभीर वळणावर आली आहे. शिक्षेचा काळ संपूनही केवळ दंड न भरल्यामुळे बादलची सुटका लांबणीवर पडली आहे. यामुळे हतबल झालेल्या त्याच्या माता-पित्यांनी आता जिल्हा प्रशासनाकडे मदतीची याचना केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला आहे.