

badrinath dham new
esakal
उत्तराखंड: उत्तराखंडमधील जगप्रसिद्ध बद्रीनाथ धामने यंदा भाविकांच्या उपस्थितीचा आतापर्यंतचा सर्वकालीन विक्रम मोडला आहे. २३ एप्रिल रोजी सुरू झालेल्या चारधाम यात्रेत २२ सप्टेंबरपर्यंत तब्बल १७ लाख ७९ हजार ८०५ भाविकांनी भगवान बद्रीविशालचे दर्शन घेतले आहे. अवघ्या १५३ दिवसांत हा नवा विक्रम प्रस्थापित झाला असून, यात्रेची सांगता होण्यास अद्याप दीड ते दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे यंदा भाविकांच्या संख्येचा नवा उच्चांक नोंदवला जाण्याची शक्यता आहे.