Badrinath Temple is set to close for the winter season on November 16, 2026, following traditional rituals.
esakal
उत्तराखंड : उत्तराखंडमधील प्रसिद्ध बदरीनाथ धामाचे कपाट आज, सोमवारी (१६ नोव्हेंबर) रात्री ९ वाजून ३७ मिनिटांनी हिवाळी हंगामासाठी बंद करण्यात येणार आहे. वैदिक मंत्रोच्चार आणि पारंपरिक धार्मिक विधींनुसार हा सोहळा पार पडणार असून, यासोबतच यंदाच्या चारधाम यात्रेची अधिकृत सांगता होईल.
कपाट बंद होण्याच्या पारंपरिक विधीमध्ये मंदिराचे मुख्य पुजारी (रावल) स्त्री वेश धारण करून माता लक्ष्मीच्या मूर्तीला भगवान बदरी-विशाल यांच्या गर्भगृहात विराजमान करतात. शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरेला विशेष धार्मिक महत्त्व आहे. त्यानंतर भगवान बदरीनाथांना शुद्ध तुपात भिजवलेले 'घृत कंबल' पांघरले जाईल. अखंड ज्योत प्रज्वलित करून मंदिराचे दरवाजे पुढील सहा महिन्यांसाठी बंद केले जातील.