

Badrinath Helicopter Crash
esakal
Dehradun: उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात बद्रीनाथ धाम आणि जोशीमठदरम्यान ट्रान्स भारत एव्हिएशन कंपनीचे हेलिकॉप्टर आज बेपत्ता झाले. हे हेलिकॉप्टर बद्रीनाथहून परतत असताना त्याच्याशी संपर्क तुटला. त्यामध्ये पायलटसह सहा जण प्रवास करत होते. हेलिकॉप्टरचा शोध घेण्यासाठी प्रशासन आणि संबंधित यंत्रणा प्रयत्न करत आहेत. ताज्या माहितीनुसार हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्या सर्व सहा जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा